राजावाडी रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत विशेष बैठक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजावाडी रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत विशेष बैठक

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)घाटकोपर येथील मुंबई महानगरपालिकेचे राजावाडी रुग्णालयच 'व्हेंटिलेटर'वर असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. येथे दाखल होणार्‍या रुग्णांपैकी रोज सरासरी १६ रुग्ण दगावत आहेत. तसेच डॉक्टरांचीही कमतरता आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य प्रवीण छेडा, दिलीप लांडे आणि धनंजय पिसाळ यांनी दिली. या रुग्णालयाची दुरवस्था झाली असून त्यात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राजावाडी रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी या सदस्यांनी केली.
या रुग्णालयात गेल्या १३ वर्षांत १६ हजार रुग्ण मृत पावले असून येथे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांची कमतरता आहे. तसेच येथे चांगल्या सुविधा नसून औषधेही मिळत नाहीत. रुग्णालयांचे प्लॅस्टर पडत आहे आणि छतही खराब झाले आहे. तिच अवस्था केईएम आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाची झाली आहे. यामुळे तीनही रुग्णालयांवर ताण येतो, याकडे छेडा, लांडे आणि पिसाळ यांनी लक्ष वेधले. नायर रुग्णालयात गेल्या १३ वर्षांत २९ हजार ६५0, शीव रुग्णालयात ६३ हजार ३१३ आणि राजावाडीत रुग्णालयात १६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती छेडा यांनी दिली.

शहर भागात मृतांचे प्रमाण सातमुंबई शहर भागात नैसर्गिक आणि आजाराने मृत पावणार्‍यांचे प्रमाण दररोज सात असून उपनगरात हे प्रमाण पाच ते सहा आहे, अशी माहिती देशमुख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

२0१३-१४ मध्ये राजावाडीत १00८ रुग्णांचा मृत्यू राजावाडी रुग्णालयात २0१३-१४ मध्ये १00८ रुग्ण दगावले आहेत. तर येथे ५८0 खाटा असल्या तरी ८0 खाटा वापरात नाहीत आणि येथे दररोज १ हजार ६00 रुग्णांची नोंद होते. महापालिकेला लवकरच ४८0 शिकाऊ डॉक्टर मिळणार आहेत. त्यापैकी ५0 टक्के शिकाऊ डॉक्टर उपनगरातील रुग्णालयात आणि ५0 टक्के डॉक्टर शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
     

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages