अत्याचारांविरोधात चर्चगेटला निदर्शने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अत्याचारांविरोधात चर्चगेटला निदर्शने

Share This
मुंबई - राज्यात दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात सत्यशोधक ओबीसी परिषदेतर्फे शुक्रवारी चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने करण्यात आली. गौतम बुद्धांच्या अस्थींचे प्रदर्शन मांडल्याबद्दल मनसेचे आमदार राम कदम व दलित समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बाबा रामदेव यांचा यावेळी निषेध करण्यात आला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनांपासून समाजाने दूर राहावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.राज्यात जातीद्वेषामुळे अत्याचारांच्या घटनांत झालेली वाढ सरकारने रोखावी, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केली आहे. बहुजन समाजाने शांती व अहिंसेचा मार्ग दाखवणारी आणि बहुजनांच्या हिताचा विचार करणारी विचारधारा स्वीकारावी व 14 मे रोजी गौतम बुद्धांची जयंती साजरी करावी, असे ते म्हणाले. श्रीकांत गजभिये, डॉ. भावना राठोड, मारुती कुंभार, प्रकाश शिशुपाल आदींनी निदर्शनांत भाग घेतला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages