भाडे नाकारणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांना चाप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाडे नाकारणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांना चाप

Share This
मुंबई - दारू ढोसून तसेच मोठमोठ्याने हॉर्न वाजवत सुसाट गाड्या चालविणार्‍यां बरोबर प्रवासी भाडे नाकारणार्‍या मुजोर चालकांची मस्ती उतरविण्याची जोरदार मोहीम वाहतूक पोलिसांनी चालवली आहे. गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी ठिकठिकाणी सापळे रचून वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर धडक कारवाई केली आहे.
दारू पिऊन तसेच सुसाट गाड्या चालवू नका, रात्रीच्या वेळेस मोठमोठ्याने हॉर्न वाजवू नका अशा वाहतूक पोलिसांकडून वारंवार सूचना केल्या जात असतानाही काही उत्साही चालक नेमके त्याच्या उलटच करतात. तसेच अनेक टॅक्सी व रिक्षाचालक प्रवासी भाडे नाकारतात. पार्किंगची जागा नसतानाही वाटेल तशा गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे पश्‍चिम व उत्तर उपनगरात वाहतूक पोलिसांनी अशा चालकांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून धडक मोहीम हाती घेतली आहे.
 जानेवारी ते एप्रिलदरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई
गुन्हे               २०१४    २०१३
भाडे नाकारणे २३५१    १००४
रॅश ड्रायव्हिंग १२४४     ८४०
ड्रंक ड्रायव्हिंग २८२६    २१८३
हॉर्न वाजवणे २६२०       ९५८

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages