मरेवर वाढतेय फुकट्यांची संख्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 May 2014

मरेवर वाढतेय फुकट्यांची संख्या

मुंबई : उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसर्‍याला देणे, विदाऊट तिकीट प्रवास करणे अशा घटनांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेने ११ करोड 0३ लाख रुपये दंड वसूल केला आहे. एप्रिल महिन्यात फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण २ लाख १४ हजार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ११ करोड ३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल २0१३ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख ६७ हजार गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यांच्याकडून ८ करोड ४0 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. त्याशिवाय या कारवाईत आपले आरक्षित तिकीट दुसर्‍याला देणार्‍या ६१0 जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून एकूण ४ लाख ४४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांनी विदाऊट तिकीट प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS