मुंबईत पाणीटंचाई जाणवणार नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत पाणीटंचाई जाणवणार नाही

Share This
मुंबई - देशात यंदा सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 80 टक्के पाऊस पडला तरी मुंबईत पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली. 

2009 मध्ये पावसाने ओढ दिल्यावर मुंबईला वर्षभर पाणीकपातीची झळ सोसावी लागली होती. यंदा सरासरी 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने महापालिका प्रशासनाने काय तयारी केली आहे, असा प्रश्‍न स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी विचारला. सध्या मुंबईत मुबलक पाणी असून, जून-जुलैपर्यंत चिंता नाही. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, तरीही काळजी करण्याचे कारण नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात सरासरी 80 टक्के पाऊस झाला तरी धरणे भरून वाहू लागतात, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी दिली. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याचाही प्रशासनाचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. 

तलाव पाणीसाठा (दशलक्ष लिटर) अप्पर वैतरणा 91,185 
मोडकसागर 59,097 
तानसा 43,955 
विहार 6,536 
तुळसी 3,655 
भातसा 1,98,166 
एकूण 4,02,594

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages