पालिका अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांचा हल्ला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांचा हल्ला

Share This
मुंबई - घाटकोपर पूर्वेला हिंगवाला लेन येथील जोशी मार्केटमध्ये फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पालिकेचे अधिकारी प्रवीण देवरे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. यात देवरे जखमी झाले. या प्रकरणी दोन फेरीवाल्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. राजीव काटेवाडी आणि कितन काटेवाडी अशी अटक केलेल्या फेरीवाल्यांची नावे आहेत. महापालिकेचे पथक आज जोशी मार्केटमध्ये कारवाईसाठी आले होते. या वेळी फेरीवाल्यांची देवरे यांच्याशी बाचाबाची झाली. त्यानंतर फेरीवाल्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण करणाऱ्या दोन फेरीवाल्यांना पंतनगर पोलिसांनी अटक केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages