मी स्वतः विधानसभा निवडणूक लढविणार - राज ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मी स्वतः विधानसभा निवडणूक लढविणार - राज ठाकरे

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comआगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः विधानसभा निवडणूक लढविणार अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केली. येथील सोमय्या मैदानात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही महत्वाची घोषणा केली. जनतेनं कौल दिला तर नेतृत्वही करेन असं सांगत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शवली. ठाकरे घराण्यात स्वतः निवडणूक लढणारे राज ठाकरे पहिलेच ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांच्या दारुण पराभवानंतर राज यांनी हा मेळावा आयोजित केला होता. 'या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे' अशा आशयाचे बॅनर्स व पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आले होते. खोल विचारमंथन केल्यानंतर आपण निवडणूक लढविण्याच्या निष्कर्षाप्रत आलो असल्याचं राज यांनी यावेळी सांगितलं.

विधानसभेत मुसंडी मारेनः राजराज यांनी सभेच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. लोकसभेत मनसेच्या पराभवाची कारणमीमांसा केली. इंदिरा गांधी यांनीदेखील पराभव सहन करावा लागला होती. या निवडणुकीत सर्वजण फक्त नरेंद्र मोदींच्या करिष्यामुळे निवडून आले असल्याचं राज म्हणाले. कॉंग्रेस पक्षाच्या नाकर्तेपणामुळे त्यांचा पराभव झाला. आगामी विधानसभेत मी मुसंडी मारेन असं ते म्हणाले. बॉल जितका जास्त आदळला तेवढा जास्त उसळतो असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्देःनरेंद्र मोदी नसते तर हे यश मिळालं नसतं
राहुल गांधी हा एकमेव महात्मा गांधींचा अनुयायी. काँग्रेस संपवण्याचे स्वप्न त्याने साकार करून दाखवलं.
लोकसभा निवडणुका न लढवण्याचा माझा विचार होता.
इतरांना ३० वर्ष महापालिका हातात देता, त्यांना कुणी विचारत नाही. मलाच का नाशिकबद्दल सतत विचारतात
दोष नाशिकच्या जनतेचा, पत्रकारांना नाही. दोष मनसे पदाधिकाऱ्यांचा. ते कामाबद्दल बोलत नाही
खळ्ळ खट्याक'चा अर्थच मुळी मनसैनिकांना कळला नाही
कार्यकर्त्यांना काही थेट बोलायचं असेल तर घराच्या पत्त्यावर पत्र पाठवा

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages