मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) कामाच्या तणावामुळे किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे बेस्ट कर्मचारी तंबाखू खातात; परंतु बेस्टने आता तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नक्की अमलात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी सांगितले.
यावेळी गुप्ता यांनी केवळ बेस्टचे 50 हजार कर्मचारीच नाही तर त्यातून प्रवास करणारे 50 लाख प्रवासीही तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतील आणि बेस्ट जात असलेल्या भागांत बेस्ट बसद्वारे याविषयी प्रचार केला जाईल, असे ते म्हणाले. तंबाखूचे दुष्परिणाम सांगण्यासाठी कर्मचाऱ्यांत जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर म्हणाले. आठवडाभर बेस्टच्या डेपोंमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कॅन्सर पेशंट असोसिएशन एडचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर विवेक ओबेरॉय याच्या हस्ते यावेळी तंबाखूमुळे वाचा गमावलेल्या दोन रुग्णांना "व्हॉईस बॉक्स' देण्यात आला. यावेळी विवेकने तंबाखूचे सेवन कधीच करू नका, असा सल्ला रुग्णांना दिला. संस्थेद्वारे बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत तपासणी करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. क्रिकेटपटू विनोद कांबळी याने काही क्रिकेटपटूंची उदाहरणेही दिली. मॅच खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाही ताण येतो, पण ते तंबाखू खात नाहीत. त्याप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कितीही ताण आला तरी तंबाखू खाऊ नये, अशी विनंती कांबळी यांनी केली. बेस्टचे बसवाहक खरात आणि नीलेश कांबळे, तसेच स्टोअर सुपरवायझर राहुल कांबळे या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी तंबाखू सोडण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला. त्यांचा क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.