मुंबई - दोघा महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र मेढसिंग यांच्यावर दहिसर आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. विवाहित असूनही एका महिलेला धमकावून तिच्यासोबत त्याने लग्न केले होते. या महिलेला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची पहिली पत्नी व मुलगा यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिस दलात महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या मेढसिंग याने एप्रिल 2005 ते मार्च 2014 या काळात एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. या महिलेला धमक्या देऊन तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. तिला गर्भपातही करायला लावला. विवाहित असूनही या महिलेसोबत लग्न करून तिची फसवणूक केली. नंतर मेढसिंग याला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला त्याची पहिली पत्नी सुजाता आणि मुलगा प्रथमेश यांनी अनेकदा शिवीगाळ व मारहाण केली. धमक्याही दिल्या. या प्रकरणी पीडित महिलेने महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सखोल चौकशीनंतर या विभागाच्या उपायुक्तांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला होता.
पती व मुलांना ठार मारण्याची; तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन मेढसिंग याने आपल्यावर 2012 मध्ये बलात्कार केला, अशी आणखी एक तक्रार 42 वर्षीय महिलेने आझाद मैदान पोलिसांकडे केली आहे. तिच्या तक्रारीवरून मेढसिंग आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरुद्ध बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. शस्त्राचा धाक दाखवून महिलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन कारमध्येच बलात्कार केल्याचेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.