ऑनलाइन पास योजनेकडे प्रवाशांनी फिरवली पाठ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑनलाइन पास योजनेकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

Share This
ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य देणार्‍या मुंबईकरांनी मध्य रेल्वेच्या ऑनलाइन पास योजनेला मात्र ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. मध्य रेल्वेच्या ४0 लाख प्रवाशांपैकी सुमारे ७0 टक्के प्रवासी म्हणजे जवळ जवळ २८ लाख प्रवासी हे मासिक किंवा त्रैमासिक पासधारक आहेत. या २८ लाख पासधारक प्रवाशांपैकी फक्त १00 प्रवाशांनीच ऑनलाइन पास काढल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ऑनलाइन पाससाठी कोणतीही किचकट प्रक्रिया नसूनही प्रवाशांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. 
मध्य रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ४0 ते ४२ लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी ७0 टक्के प्रवासी हे पासधारक आहेत. पासधारकांना तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे राहून पास काढावा लागतो. प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये आणि त्यांचा वेळ वाचावा, यासाठी मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँण्ड टुरिझम महामंडळाच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून ऑनलाइन पासची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर ऑटोमॅटिक तिकीट व्हेडिंग मशिन्स (एटीव्हीएम) आणि जनसाधारण तिकीट बुकिंग क्लार्क (जेटीबीएस) कडेही पासचे नूतनीकरण करता येऊ शकते. यापैकी जेटीबीएसप्रणाली वगळता इतर दोन्ही योजनांना प्रवाशांनी प्रतिसाद दिलेला नाही. 

एटीव्हीएमद्वारे सुमारे १000 जण पासचे नूतनीकरण करतात, परंतु ऑनलाइन पास योजनेद्वारे फक्त १00 प्रवासी आपला पास काढतात. ऑनलाइन पास काढल्यास तो घरी मोफत पाठविण्यात येतो. परंतु मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसीने या योजनेचा प्रसार प्रभावीपणे केला नसल्यामुळे अनेक प्रवाशांना ही योजनाच ठाऊक नाही. ज्या प्रवाशांना ही योजना माहीत आहे, त्यांना या योजनेविषयी अनेक शंका आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages