शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2014

शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

मुंबई/जेपीएन न्यूज: छत्रपती शिवाजी महाराज यांचा 341 वा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जूनला मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्ताने 5 आणि 6 जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्यवाह शांताराम कुंजीर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण ऐतिहासिक वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे. त्यात पहिल्या दिवशी गड पूजन, शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके, रात्र शाहिरांची यासारखे कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण, शाहिरी मुजरा, अभिषेक, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS