प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत

Share This
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भाजपच्या रुपाने गैरकाँग्रेसी राजकीय पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशातील सर्व ५४४ लोकसभा मतदारसंघांमधील मतमोजणीचे कल पाहता भाजप २७८ तर एनडीएतील अन्य घटक पक्षांचे मिळून ३२२ उमेदवार निर्णायक आघाडीवर असून 'अब की बार मोदी सरकार' हा भाजपचा नारा सत्यात उतरण्याची केवळ औपचारीकता आता उरली आहे.
मोदींच्या नेतृत्वाने एनडीएला बुस्टर डोसच मिळाला आहे. देशभरात एनडीएची विजयी पताका फडकताना दिसत असल्याने नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून 'भारत जिंकला...अच्छे दिन आने वाले है' अशी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदीलाटेत काँग्रेससह यूपीएतील सर्वच घटक पक्ष वाहून गेले असून काँग्रेस अवघ्या ५० तर अन्य पक्ष मिळून यूपीए ६३ जागांवर घसरला आहे. भाजपसाठी जसा हा ऐतिहासिक विजय आहे तसाच काँग्रेससाठीही इतिहासातील हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरणार आहे.

अच्छे दिन आनेवाले है!: मोदी
'भारत जिंकला आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा भारताचा विजय आहे. भारत के लिए अच्छे दिन आने वाले है!' ही प्रतिक्रिया आहे भाजपला यशोशिखरावर पोहोचविणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत यशानंतर मोदींनी ट्विटरवरून ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages