दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचे अर्धे डबे आरक्षित होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचे अर्धे डबे आरक्षित होणार

Share This
मुंबई - दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला रविवारी झालेल्या अपघातात प्रवाशांची ओळख पटण्यास लागलेला वेळ पाहता यापुढे पॅसेंजरचे अर्धे डबे आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडीयर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. त्यामुळेच या मार्गावर आयत्यावेळी प्रवास करणार्‍या सर्वसामान्य प्रवाशांची कुंचबणा होणार आहे.
अपघातग्रस्त दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला २० डबे होते. त्यातील दोन डबे वगळता इतर सर्व डबे अनारक्षित होते. या गाडीत दोन हजार प्रवासी होते. डब्यातील प्रवाशांची माहिती, टेलिफोन क्रमांक मिळविणे रेल्वे प्रशासनास जिकिरीचे ठरले होते. आरक्षित डब्यांमुळे प्रवाशांची माहिती मिळणे सोपे होते. त्यामुळे भविष्यात पॅसेंजरचे अर्धे डबे आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

रुळांना वारंवार तडे पडून अपघाताच्या घटना वाढत असल्याने रेल्वेच्या खात्यातील सर्वाधिक महत्त्वाचा कर्मचारी असलेला ‘गँगमन’ दुर्लक्षला गेल्याने त्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याचेही सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेला अपघात वेल्डिंगचा तुकडा तुटल्यानेच झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचेही सूद यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत होत असून दोन महिन्यानंतर अहवाल प्राप्त होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages