'हिट अँड रन' प्रकरणी साक्षीदारांनी सलमानला ओळखले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'हिट अँड रन' प्रकरणी साक्षीदारांनी सलमानला ओळखले

Share This
मुंबई - दहा वर्षांपूर्वी घडलेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेता सलमान खान याची दोन्ही साक्षीदारांनी ओळख पटविल्याने त्याच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 
सलमान विरोधातील खटल्याला नव्याने सुरवात झाली असून, आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीवेळी सलमान स्वतः न्यायालयात हजर होता. या प्रकरणी साक्षीदार असलेल्या मुस्लिम शेख आणि मुन्नु खान या दोघांनाही त्याची ओळख पटविली. मुन्नु शेखने न्यायालयात सांगितले, की या घटनेवेळी सलमान एवढा नशेत होता, की धडकेनंतर तो गाडीतून उतरला आणि नशेच्या अवस्थेत तसाच रस्त्यावर पडला. 

वांद्रे येथील कार्टर रोडवर सप्टेंबर 2002 मध्ये सलमान खानने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या खटल्यात सदोष मनुष्यवधाचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे. या आरोपामुळे त्याच्याविरोधात खटल्याच्या सुनावणीस पुन्हा सुरवात झाली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages