बेस्टच्या सुविधांवर कर्मचार्‍यांची नाराजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या सुविधांवर कर्मचार्‍यांची नाराजी

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: मुंबईकरांची सेकण्ड लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेस्ट उपक्रमातील प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था, कॅण्टीनची दुर्दशा, खाद्यपदार्थाचा घसरलेला दर्जा, विश्रांतीगृहांची दुरवस्था अशा विविध समस्यांनी बेस्टचे चालक-वाहक कंटाळले आहेत. बेस्ट वर्कर्स युनियनच्या समितीने नुकत्याच केलेल्या आढाव्यात कर्मचार्‍यांनी बेस्टने सुविधांचा दर्जा वाढवण्यावर भर दिला आहे.
बेस्टची आर्थिक स्थिती ढासळल्याने बेस्ट प्रशासनाला कर्मचार्‍यांना वेळेत पगार देणेही अशक्य झाले आहे. अशा स्थितीत १ जूनपासून नवे कॅनेडियन ट्रॅपेझ पद्धतीने वेळापत्रक चालक-वाहकांना लागू करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या वेळापत्रकाबाबत कर्मचार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी युनियनतर्फे एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने सर्व डेपोंमध्ये जाऊन चालक-वाहकांची मते जाणून घेतली आहेत. त्यात नवीन पद्धत लागू करण्यापूर्वी प्रशासनाने किमान सर्व सुविधांचा दर्जा वाढवावा, अशी सूचना केली आहे.

या सर्व्हेक्षणात सुमारे ९७ टक्के चालक-वाहक वर्गाने डेपोंमधील प्रसाधनगृहांच्या स्थितीविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ९१ टक्के कर्मचार्‍यांनी कॅण्टीनच्या वाईट दर्जाविषयी आक्षेप नोंदवला आहे. ८६ टक्के कर्मचार्‍यांनी डेपोमधील विश्रांतीगृहांविषयी तक्रार केली आहे. कर्मचार्‍यांची मते जाणून घेण्यासाठी युनियनतर्फे ६ सदस्य समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात बेस्टचे नवृत्त वाहतूक अधिकारी, नियंत्रक, चालक-वाहक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने बेस्टच्या २६ डेपोंमध्ये जाऊन सुमारे १८00 कर्मचार्‍यांक डून मते जाणून घेतली आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages