'बेस्ट' वेळापत्रक लवकरच मोबाइलवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'बेस्ट' वेळापत्रक लवकरच मोबाइलवर

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: मुंबईची धमनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेस्टचे वेळापत्रक मोबाइलवर उपलब्ध झाल्यास कसे वाटेल, नक्कीच आवडेल ना! प्रवाशांच्या हाती लवकरच मोबाइलवर ऑनलाइन वेळापत्रक मिळणार आहे. यामध्ये कोणत्या वेळी स्टॉपवर बस येईल आणि इतर माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
लोकल, मेल/एक्स्प्रेसच्या नेमक्या वेळापत्रकाची माहिती मोबाइलवर उपलब्ध होते. नेमक्या त्याच धर्तीवर बेस्टने ही सेवा देण्याचा चंग बांधला आहे. अँण्ड्राईडच्या साहाय्याने प्रवाशांना कोणती बस कोणत्या स्टॉपवर पोहचेल याची माहिती क्षणार्धात मिळणार आहे. बेस्टच्या ताफ्यात ४,३३६ बसेस आहेत. त्यापैकी १0 टक्के बसेस दररोज देखभालीसाठी आगारात पाठवल्या जातात. या बसेसपैकी १७00 बसेसमध्ये पीएसआय यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित केली आहे, तर उर्वरित बसेसमध्ये टप्प्याटप्प्यात सेवा उपलब्ध केली जाणार आहे. या सेवेत मोबाइल, इंटरनेट किंवा एसएमएसच्या मदतीने प्रवाशांना बसेसची माहिती मिळणार आहे. आतापर्यंत १७00 बसेसमध्ये पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीएसआय) यंत्रणा बसवली आहे, तर उर्वरित २२00 बसेसमध्ये वर्षभरात ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली जाणार आहे.

बेस्टने जून २0१२ पासून हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात सुरुवातीला २८0 बसेसमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. त्यानंतर इतर मार्गांवरील बसेसना प्राधान्य देण्यात आले आहे. बेस्टच्या बेस्ट टीव्ही अँप्लिकेशनच्या मदतीने प्रवाशांना बसेसची अचूक वेळ कळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages