महापालिकेची अनधिकृत कॅम्पा कोलाला नोटीस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेची अनधिकृत कॅम्पा कोलाला नोटीस

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: 'घराच्या चाव्या महापालिकेच्या जी/दक्षिण विभाग कार्यालयात २९ मे ते २ जून या कालावधीत सकाळी १0 ते सायंकाळी पाचपर्यंत जमा करण्याची नोटीस महापालिकेने सोमवारी वरळी येथील कॅम्पा कोलामधील अनधिकृत सदनिकाधारकांना बजावली. यामुळे या बेकायदेशीर सदनिकाधारकांना कॅम्पा कोलामधून कायमचे हटवण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली आहेत, मात्र गेल्यावेळेचा अनुभव लक्षात घेता या खेपेस पालिकेने हे प्रकरण सावधगिरीने हाताळण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅम्पा कोला कंपाऊंडमधील अनधिकृत फ्लॅटधारकांना तेथे राहण्यासाठी यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही येथील रहिवासी बाहेर न पडण्यासाठी प्रयत्नशील होते; पण पालिकेने हे अनधिकृत फ्लॅट पाडण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार महापालिकेने सोमवारी येथील रहिवाशांना घराच्या चाव्या जी/दक्षिण विभाग कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. येथील रहिवाशांनी चाव्या पालिकेकडे जमा केल्या नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी यासंदर्भात सांगितले, कॅम्पा कोलामधील जे रहिवासी पालिकेकडे घराच्या चाव्या जमा करणार नाहीत, त्यांची नावे सर्वोच्च न्यायालयाला कळवण्यात येणार असून, न्यायालय त्यांच्याबद्दल निर्णय घेईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages