रेल्वे फलाटांची उंची वाढवण्यास मंजुरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे फलाटांची उंची वाढवण्यास मंजुरी

Share This
मुंबई - मुंबईतील उपनगरीय रेल्वे फलाटांची उंची वाढविण्यास रेल्वे प्रशासनाने अखेर ग्रीन सिग्नल दिला. मोनिका मोरे या युवतीला हात गमवावे लागलेल्या घाटकोपर रेल्वेस्थानकातून शुक्रवारी या कामाची सुरुवात होणार आहे. मुंबईतील 54 स्थानकांतील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात येणार आहे. ही कामे दोन वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. तसेच मुंबईतील अन्य प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात सर्व खासदारांसोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतही माहिती दिली. त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. अपघाताला कारण ठरलेल्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत होतो; पण रेल्वे प्रशासन दाद देत नव्हते. आता मोदी सरकार आल्याने प्रशासनाने हालचाल सुरू केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मुंबईतील मेट्रो रेल्वेचे तिकीट दर ठरविताना राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, खासगी कंत्राटदाराला मनमानी करण्यास वाव मिळू नये, अशी मागणी सोमय्या आणि शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या, विक्रांत नौकेवर स्मारक उभारणे, मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडची समस्या, मिठागर आणि संरक्षण विभागाच्या जमिनीलगतच्या जमिनींचा विकास करणे, तानसा पाईपलाईनलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन, तसेच कॅम्पा कोला इमारतीच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईतील खासदारांसोबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages