मुंबई - दुरुस्तीसह विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर पश्चिम व पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.
कल्याण ते टिटवाळा मार्गावर दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत डाऊन दिशेच्या सहा व अप दिशेच्या 6 गाड्या अशा 12 गाड्या रद्द करण्यात येतील. याव्यतिरिक्त या दोन स्थानकांदरम्यान अप मार्गावर रविवार-सोमवार, बुधवार-गुरुवार व शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री पावणेबारा ते पावणेतीन वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे सीएसटीहून रात्री 9.35 ला सुटणारी टिटवाळा, टिटवाळ्याहून रात्री 11.45 ला सुटणारी कुर्ला व आसनगावहून रात्री 11.47 वाजता सुटणारी कल्याण लोकल रद्द करण्यात येईल.
हार्बरवर मानखुर्द ते कुर्ला अप व डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत, तर सीएसटीहून पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहतील. या वेळेत सीएसटी ते कुर्ला व मानखुर्द ते पनवेल मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येतील. या मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर व मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.