पालिकेच्या सीसीटीव्हीची मेमरी फक्त तीन दिवसांचीच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या सीसीटीव्हीची मेमरी फक्त तीन दिवसांचीच

Share This
मुंबई - सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेने मुख्यालयाबरोबरच सर्वच विभाग कार्यालयांत सीसी टीव्ही कॅमरे लावले आहेत; मात्र त्यांच्या सर्व्हरची क्षमता कमी असल्याने केवळ तीन दिवसांचेच रेकॉर्डिंग राहत आहे. ही क्षमता वाढविण्याचा निर्णय घेऊन वर्ष झाले, तरी अद्याप पालिकेतर्फे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. 
अझीज अमरेलीवाला यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेच्या अंधेरी येथील के-पूर्व विभाग कार्यालयातील सीसी टीव्हींचे रेकॉर्डिंग मागितले होते. या माहितीच्या अधिकाराला दाद न मिळाल्याने त्यांनी उपसुरक्षा अधिकाऱ्यांकडे अपील केले. त्या वेळी त्यांना अवघ्या तीन दिवसांचे रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. सर्वच महापालिका कार्यालये, रुग्णालये यांचे सीसी टीव्ही रेकॉर्डिंग केवळ तीन ते चार दिवस राहत आहे. 

ही क्षमता वाढविण्याची मागणी वेळोवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी तसे निर्देशही प्रत्येक विभागातील सीसी टीव्हीचे परीक्षण करणाऱ्या कंपन्यांना दिले होते. वर्षभरापूर्वी हे आदेश देण्यात आले होते; मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages