मनपा कर्मचार्‍यांना थकबाकी मिळण्याच्या मुदतीत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनपा कर्मचार्‍यांना थकबाकी मिळण्याच्या मुदतीत वाढ

Share This
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातून १ जानेवारी २00६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगानुसार नवीन पद्धतीने वेतन निश्‍चिती करण्यात आली आहे. या वेतन निश्‍चितीपोटी मिळणारी थकबाकी संबंधित कर्मचार्‍यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांनी आपापल्या शाळांमधून थकबाकीची बिले पेनड्राईव्हने संबंधित प्रशासनाधिकारी (शाळा) यांच्याकडे सादर करायची आहेत. पेनड्राईव्ह सादर करण्याच्या मुदतीला प्रशासनाने १९ जून २0१४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांनी पेनड्राईव्ह सादर करण्यासाठी लवकरात लवकर आपापल्या शाळांशी संपर्क साधून तेथे थकबाकीची बिले तयार करून ती प्रशासन अधिकारी (शाळा) यांच्याकडे १९ जून २0१४ पूर्वी सादर करावी, असे आवाहन शिक्षण सभेच्या निवृत्त कक्षाकडून करण्यात आले आहे. तरी सेवानवृत्त आणि सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांनी १५ जून रोजी शाळा सुरू होताच थकबाकी मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages