मुंबईचे हवामान मोबाईल ऍपवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईचे हवामान मोबाईल ऍपवर

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: धुवांधार पाऊस सुरू आहे. घराबाहेर तळे साचले आहे, अशा परिस्थितीत तातडीने कामावर पोहोचायचेच असेल, तर मोबाईलवर तुम्हाला मुंबई शहरातील हवामान समजेल. त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेने खास "मोबाईल ऍप' तयार केले आहे. 1 जूनपासून ते सुरू होणार आहे. पावसाळ्यात हवामानाची माहिती देण्यासाठी महापालिका दर वर्षी संकेतस्थळ सुरू करीत असे. या वेळी एक पाऊल पुढे टाकून "ऍण्ड्रॉईड मोबाईल ऍप' सुरू करण्यात येणार आहे. या ऍपमध्ये शहरातील हवामानाच्या माहितीबरोबरच पावसाचे प्रमाण, समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी; तसेच पावसाबाबत इतर माहितीही मिळणार आहे. या ऍपवरून शहरातील प्रत्येक विभागाची माहिती मिळण्याबरोबरच पावसाचा अंदाजही मिळू शकेल. त्यामुळे दिवसाचे नियोजन करणे शक्‍य होईल. पालिकेने शहरातील 65 ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. त्या यंत्रातून मिळणारे पावसाचे प्रमाण ऍपवर दाखवले जाईल. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages