"बेस्ट'ला तंबाखूमुक्त करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2014

"बेस्ट'ला तंबाखूमुक्त करणार

मुंबई/जेपीएन न्यूज: कॅन्सर पेशंट एड असोसिएशन या संस्थेद्वारे शुक्रवारी (ता. 30) "बेस्ट'च्या कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त हा उपक्रम राबवला जात आहे. बेस्टला तंबाखूमुक्त जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला बेस्टचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. सुहासिनी नागदा, अभिनेता विवेक ओबेरॉय, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेत्री नितू चंद्रा, कॅन्सर पेशंट एड सोसायटीचे अध्यक्ष वाय. के. सप्रू उपस्थित राहणार आहेत. बेस्टच्या कुलाबा डेपोतील ऑडिटोरियममध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS