रेल्वेला ठेकेदारांनी गिळले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेला ठेकेदारांनी गिळले

Share This
भारतीय रेल्वेचा कारभार असुरक्षित हातात गेला आहे. इंजिनाच्या दुरुस्तीपासून कोचेसच्या देखरेखीपर्यंतची सर्व महत्त्वाची कामे कंत्राटी पद्धतीवर होत असल्याने रेल्वेचा प्रवास पूर्वीसारखा सुरक्षित राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.एसी कोचेसच्या देखरेखीसाठी अटेण्डटसच्या ४०० जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या आहेत. बेड रोल, पडदे, चेक करणे इतकेच काय तर फायर फायटिंग उपकरणाची खातरजमा करणे, मेकॅनिकलला मदत करणे अशी जोखमीची कामे कंत्राटी कामगारांवर सोपविली जात आहेत.
पूर्वी सर्व कामे रेल्वेच्या कर्मचार्‍यांमार्फत व्हायची. त्यांच्याकडून काही चूक घडल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून कठोर कारवाई व्हायची. आता कंत्राटी अटेण्डंट असल्याने ते नोकरी सोडून दुसरीकडे काम करतात. त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार न मिळाल्याने ते गैरकृत्य करतात. प्रवाशांकडून लाच घेऊन सिगारेट, दारू पुरवितात. त्यामुळे ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडू शकतात, असा इशारा रेल्वे कामगार संघटनांनी दिला आहे.


मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये सुमारे ८ हजार पदे मंजूर असताना केवळ ४ हजार पदेच भरली आहेत. म्हणजे ५० टक्के पदे रिक्त आहेत. पूर्वी ८० च्या दशकात भारतीय रेल्वेचे २१ लाख कर्मचारी होते. आता गाड्यांची संख्या, काम वाढूनही केवळ १३ लाख कर्मचारी उरले आहेत.
- वेणू नायर, सचिव, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages