त्यांना जनतेने जागा दाखवली - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 May 2014

त्यांना जनतेने जागा दाखवली - उद्धव ठाकरे

मुंबई - लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आम्हाला अडविण्याचा प्रयत्न केला त्यांना जनतेनेच जागा दाखवली, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुंबईतील नवनिर्वाचित खासदारांसह शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित होते. 
कॉंग्रेसने केलेल्या पापांचा घडा भरलाच होता; तो आता फुटला, कॉंग्रेसलाही त्यांची जागा दिसली. देशात कॉंग्रेसचे सरकार होते; परंतु ते आहे की नाही हे कळतच नव्हते. आता देशात मजबूत व समर्थ सरकार येत असून देशवासीयांना समर्थ नेतृत्व प्राप्त झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. आता आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास व्यक्‍त करताना ठाकरे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय जनतेला अर्पण करत आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करू. सर्वांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू, असेही उद्धव या वेळी म्हणाले. 

मोदी जिंकले, बाकी सारे हरले - राज ठाकरे दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका ओळीत आज प्रतिक्रिया दिली. "मोदी जिंकले, बाकी सारे हरले' अशा मोजक्‍याच शब्दात राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS