नवी दिल्ली : सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकतेसाठी आपला पक्ष यापुढेही कार्यरत राहील, अशी ग्वाही देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तथा उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारली. येथील काँग्रेस मुख्यालयापुढे झालेल्या एका संक्षिप्त पत्रकार परिषदेत सोनिया व राहुल गांधी या दोघांनी नव्या सरकारला शुभेच्छा देत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली. काँग्रेस देशहित व देशाच्या एकतेशी कोणतीही तडजोड करणार नाही. काँग्रेसला आदर्श परंपरा असून त्याच वाटेने आम्ही भविष्यातही मार्गक्रमण करणार आहोत. पक्ष आपल्या तत्त्वांसाठी नेहमीच संघर्षरत राहील, असे सोनिया या वेळी म्हणाल्या. राहुल यांनीही या वेळी सुहास्यवदनाने भाजपाचे अभिनंदन केले. पक्षाला अपेक्षेप्रमाणे जनतेचे सर्मथन मिळाले नाही. निकालांनी पक्षाचा अपेक्षाभंग झाला आहे. हा जनादेश पक्षाविरोधात असला तरी पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून आपण त्याचा नम्रपणे स्वीकार करतो, असे राहुल म्हणाले.
Post Top Ad
17 May 2014
Home
Unlabelled
सोनिया, राहुलनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
सोनिया, राहुलनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

