टोलमाफीमुळे एसटीची वर्षाला ३0 क ोटी रुपयांची बचत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टोलमाफीमुळे एसटीची वर्षाला ३0 क ोटी रुपयांची बचत

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची वर्षाला सुमारे ३0 कोटी रुपयांची बचत होणार असली तरी ही बचत नाममात्र ठरणार आहे. एसटीला दरवर्षी टोलमुळे सुमारे १३0 कोटी रुपये भरावे लागतात. ३0 कोटींच्या बचतीमुळे ही रक्कम १00 कोटी रुपयांवर येणार आहे.
महामंडळाकडे सुमारे १८ हजार गाड्या आहेत. त्यांच्या दिवसाला ९५ हजार फेर्‍या राज्यातून केल्या जातात. त्यामधून सुमारे ७0-७२ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३४, तर राज्य रस्ते विकास महामंडळाचे १0 असे ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एसटीस टोलमाफी दिल्यामुळे महामंडळावरील किमान १३0 कोटी रुपयांचा भार कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र सरकारने मुंबई-पुणे, मुंबई-बंगळुरू मार्गावरील टोलची माफी न दिल्याने महामंडळास त्याचा फारसा फायदा होणार नाही. 

या संदर्भात महामंडळाकडून आढावा घेण्याचे काम सुरूआहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार साधारणपणे केवळ ३0 कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर दररोज सुमारे २५0 एसटी बसेसेची ये-जा होते. त्यासाठी एका दिवसाला जवळपास २ लाख ५0 हजार रुपयांचा टोल दिला जातो. त्यानुसार दरवर्षी केवळ याच टोलसाठी ३0 कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे मोठय़ा मार्गावरील टोल माफ न झाल्याने महामंडळास त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचे महामंडळातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages