काशी - सारनाथ तीर्थयात्रा घडविण्याचा आमदार राम कंदम यांचा संकल्प - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काशी - सारनाथ तीर्थयात्रा घडविण्याचा आमदार राम कंदम यांचा संकल्प

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) घाटकोपरचे मनसेचे आमदार राम कदम यांचा नवीन ५१ हजार नागरिकांना काशी दर्शन,नागपूर दीक्षा भूमी व राजस्थान मधील प्रसिद्ध अशा अजमेर शरीफ दर्ग्याचा दर्शन घडविण्याचा केलेल्या संकल्पाचा काशी - सारनाथ यात्रे साठीचा जत्थ्या बुधवार दिनांक ११ जून २०१४ रोजी दुपारी १ वाजता लोकमान्य टर्मिनस रेल्वे स्टेशनवरून काशीला रवाना होणार आहे.
काशी दर्शनासाठीच्या  या विशेष धार्मिक  यात्रेसाठी विशेष रेल्वेच आरक्षण करण्यात आल होतं  यात्रेकरूंच्या  या  जत्थ्यामध्ये स्वत: आमदार राम कदम यांच्या समवेत ७००  स्वयंसेवकांची फौज यात्रेकरूंच्या सेवेसाठी उपस्थितअसणार आहे. ६ दिवसांसाठी हि यात्रा असणार आहे. 

यात्रेकरूंना विश्रांतीसाठी वारानाशीमध्ये व्यवस्था करण्यात आली असून काशी  दर्शनानंतर प्रयाग, सीतामढी , विध्यांचलचेही दर्शन,त्रिवेणी संगम तसेच गौतम बुद्धांच्या सारनाथ या पवित्र तीर्थ क्षेत्राच आमदार राम कदम यात्रेकरूना दर्शन घडवणार आहे. आमदार राम कदम यांच्या यापूर्वीचा काशी यात्रा शिर्डी दर्शन व लोणावालाच्या एकविरा मातेच्या यात्रेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाआहे .

काशी यात्रेसाठी दर्शनासाठी  निघालेल्या जत्थामध्येविशेत: महिलांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग होता अशाच प्रकारे महिन्यात दर दहा दिवसांनी काशी -सारनाथ-शिर्डी तीर्थयात्रा  आमदार राम कदम घडवणार आहेत, त्यामुळे या यात्रा घाटकोपर व आजूबाजूच्या परिसरात आकार्क्षणाचा विषय ठरला आहे. .संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना काशी दर्शन घडविण्याचा कार्यक्रम होत आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages