मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) टाटा पॉवर या खाजगी वीजपुरवठा करणार्या कंपनीने मुंबई शहराला प्रत्येक दिवशी २४ तास दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच टाटा पॉवरने मान्सूनची पूर्वतयारी म्हणून मान्सून प्रीपेअर्डनेस प्रोग्राम सुरू केला आहे. पावसाळ्यात अचानक उद्भवणार्या समस्यांचा मुकाबला करता यावा व पावसाळ्यात एखादी समस्या निर्माण झाल्यास टाटा पॉवरने आपल्या कॉल सेंटरमध्ये २४ तासांची विशेष व्यवस्था केली आहे. क्रमांक १८00 २0९ ५१६१ आग लागल्यास किंवा एखादा अपघात घडल्यास, ग्राहक २५७७४३९९ या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात. या उपक्रमाबाबत बोलताना टाटा पॉवरने कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी सांगितले की, टाटा पॉवरसाठी आपल्या ग्राहकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. मान्सूनदरम्यान वीजपुरवठय़ासंदर्भात कमीत कमी समस्या उद्भवाव्यात, यासाठी सर्व बचावात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
Home
Unlabelled
टाटा पॉवरचा मान्सून प्रीपेअर्डनेस प्रोग्राम
टाटा पॉवरचा मान्सून प्रीपेअर्डनेस प्रोग्राम
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

