पालिकेच्या १00 शाळांत आठवीचे नवे वर्ग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या १00 शाळांत आठवीचे नवे वर्ग

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई महापालिकेच्या विविध १00 शाळांमध्ये या वर्षापासून इयत्ता आठवीचे नवीन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मंगळवारी शिक्षण समितीची बैठक होणार असून त्यात या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये २७ मराठी माध्यमांच्या शाळांचाही समावेश आहे. २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात पालिकेच्या एक हजार २७0 प्राथमिक शाळांमध्ये एकूण चार लाख सात हजार ४४२ विद्यार्थी, ४९ अनुदानित माध्यमिक शाळांत ३१ हजार ४३८ विद्यार्थी, ९६ विनाअनुदानित माध्यमिक शाळांत २१ हजार ८८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या २६ उर्दू, २२ हिंदी, २७ मराठी, दोन गुजराती, दोन तमीळ, दोन तेलुगू, दोन कन्नड, जुन्या तीन इंग्रजी शाळा, १४ मुंबई पब्लिक शाळा अशा एकूण १00 शाळांमध्ये आठवीचे नवे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages