मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश दिला आहे. हैदराबाद येथील हुसेन सागर जलाशयात बुद्धांचा सुमारे १0५ फुटांचा भव्य पुतळा उभा करण्यात आलेला आहे. मुंबईतील पवई तलावातही याच धर्तीवर हा पुतळा उभा करण्यात यावा, यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश दिले असल्याचे खान यांनी सांगितले.
या प्रस्तावासाठी पर्यावरण, नगरविकास, वन विभाग आदी विविध विभागांच्या मंजुरीसाठी आपण स्वत: जातीने पाठपुरावा करू तसेच मुंबईतील मिठी नदी तसेच इतर लहान आणि मोठय़ा नद्यांच्या साफसफाईचे काम अजूनही अनेक ठिकाणी बाकी आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश खान यांनी याप्रसंगी दिले.येत्या १५ दिवसांत गटनेत्यांच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव सादर करून त्यानंतर संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आयुक्त कुंटे यांनी सांगितले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, उपायुक्त खैरे, क्षीरसागर, सिटी इंजिनीयर व्हटकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
