देवनार कत्तलखान्यात विविध शुल्कांत वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देवनार कत्तलखान्यात विविध शुल्कांत वाढ

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई महापालिकेच्या देवनार कत्तलखान्यात आकारण्यात येणार्‍या विविध शुल्कात पालिकेने २५ ते १५0 टक्के वाढ केली आहे. शेळ्या, मेंढय़ा, म्हैस, बैल, पाडे व डुक्कर यांची कत्तल, परवाना हस्तांतरण, निर्यातीसाठीच्या जनावरांची कत्तल आदींच्या शुल्काचा त्यात समावेश आहे. मात्र, या दरवाढीला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. ही दरवाढ तीन वर्षांनी होत आहे.
कत्तलखान्यातील अपेक्षित सेवासुविधांमध्ये कोणतीही सुधारणा न करता ही शुल्कवाढ केली आहे, असा विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ आदींनी या शुल्कवाढीला विरोध केला आहे. 

वाढती महागाई, वाढता आस्थापना खर्च, पाणी आणि वीज आदी सेवांवर आकारण्यात येणारे सरकारी कर, यंत्रसामग्रीचा वाढता खर्च यामुळे कत्तलखान्याचा तोटा वाढला आहे आणि हा तोटा भरून काढण्यासाठी ही शुल्कवाढ पालिकेने केली आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव संमत झाल्यास आणि त्याच्या अंमलबजावणीनंतर तीन कोटी ५३ लाखांचा जादा महसूल पालिकेला मिळणार आहे. मांसाच्या परिवहन शुल्कातही २५ टक्के आणि कत्तलखान्यात हातगाडी ठेवणे वा चालवण्याच्या शुल्कातही २५ टक्के दरवाढ केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages