केंद्रीय नियंत्रण कक्षाची स्थापना - हेल्पलाइन क्र. १८00२00३0३0 - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केंद्रीय नियंत्रण कक्षाची स्थापना - हेल्पलाइन क्र. १८00२00३0३0

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमान्सून काळात उपनगरातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणे आणि इतर समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून रिलायन्स एनर्जी सज्ज झाली आहे. यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष, हेल्पलाइन आणि इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
रिलायन्स एनर्जीने केंद्रीय आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील सर्व ग्राहकांना एनर्जीच्या सर्व विभागांशी जोडण्याचे काम हे नियंत्रण कक्ष करणार आहे. मान्सून काळात नियंत्रण कक्ष उभारण्याचे रिलायन्सचे यंदा हे ८वे वर्ष आहे. आलेल्या अनुभवातून नियंत्रण कक्षात सुधारणा करण्यात आल्या आहेत. मान्सून काळात विद्युत उपकरणे भिजण्याची शक्यता असते, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते. यासारख्या घटना टाळण्यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. सखल भागात पाणी तुंबून इलेक्ट्रिक स्वीच बोर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे हा स्वीच बोर्ड बंद करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळावर अभियंते रवाना होणार आहेत. आपत्कालीन घटनांसाठी एनर्जीने ३२ पथके स्थापन केली आहेत. अतिरिक्त प्रमाणात सुट्टे भाग, केबल, ट्रान्सफॉर्मर, स्वीच गिअर पुरवण्यात येणार आहे. याश्‍विाय पाणी तुंबणार्‍या भागात हवेच्या दाबाची बोटही अभियंत्यांना पुरवण्यात येणार आहे.

हे करावेमीटर केबिन पाण्यामध्ये तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. सोसायटी आणि घरातील विद्युत उपकरणे, केबल तपासून घ्याव्यात. पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास मीटर केबिन बंद करावी. शॉर्टसर्किट झाल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. लहान मुलांना या काळात विद्युत उपकरणांपासून दूर ठेवावे.
हे करू नयेचामड्याचे बूट आणि इतर सुरक्षा पुरवणार्‍या यंत्रणा उपलब्ध नसल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये. विद्युत उपकरणे, मीटर केबिनमधून स्पार्क, धूर येत असल्यास उघड्या हातांनी स्पर्श करू नये. शरीर भिजले असताना विद्युत उपकरणांना हात लावू नये.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages