मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा व टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी दिनांक १३, १४ व १५ जून २०१४ या दरम्यान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या सोयीसाठी ही परीक्षा एकाचवेळी महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.या परीक्षेला आवश्यक असणारी प्रवेशपत्रे (Admit Cards) दिनांक ३० मे, २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या portal.mcgm. gov.in (http://www.mcgm.gov. in/) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीनुसार सार्वजनिक वृत्तपत्रांमध्ये दिनांक ०२ व ०३ मार्च, २०१४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
जाहिरातीच्या अनुषंगाने लिपिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा तसेच मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी एकाचवेळी महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये विविध परीक्षा केंद्रावर दिनांक १३,१४ व १५ जून २०१४ रोजी घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेकरीता आवश्यक प्रवेशपत्रे (Admit Cards) दिनांक ३० मे, २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याportal.mcgm. gov.in ( http://www.mcgm.gov. in/ )या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
उमेदवाराने स्वतःचे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिट काढावी. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर दिलेल्या आणि वेळोवेळी देण्यात येणाऱया सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
प्रवेशपत्र आणि ऑनलाईन परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास उमेदवारांनी मार्गदर्शनाकरीता टोल फ्री क्र. १८००१०२२००४ यावर (सकाळी१० ते सायंकाळी७ दरम्यान) संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे
