ठाणे स्टेशनात १00 सीसीटीव्ही कॅमेरे बसणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ठाणे स्टेशनात १00 सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

Share This
ठाणे / मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)  ठाण्यातील प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ठाणे स्टेशनात नवीन १00 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून सॅटीसवर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन तिकीट खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत. त्याचे उद््घाटन १५ ऑगस्ट रोजी होणार असल्याची ग्वाही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांनी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना दिली.
ठाण्यातील प्रवाशांचे प्रश्न घेऊन ठाणे-वाशी मार्गावरील प्रवाशांच्या अडचणींसंदर्भात खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम तसेच महाव्यवस्थापक एस. के. सूद यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान ठाणे स्थानकात अनेक सुविधा पुरवण्याबाबत तसेच नवीन तिकीट खिडक्या वाढवणे, फलाट एक तसेच सहा व सातवर शौचालयांची सुविधा करणे, ठाणे स्टेशनसाठी जास्त एटीव्हीएम मशीन बसवणे व स्टेशनची स्वच्छता व सुरक्षितता यावर चर्चा झाली.

ठाणे स्थानकात सध्या ४0 सीसीटीव्ही कॅमेरे असून ते अपुरे पडत आहेत. त्यासाठी नवीन १00 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याने एकूण १४0 सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे ठाणे स्थानकावर लक्ष ठेवता येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली. याबरोबर सॅटीसवर बसने येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी दोन तिकीट खिडक्या सुरू करण्यात येणार आहेत. याचे उद््घाटन १५ ऑगस्ट रोजी करता येईल, अशी ग्वाही निगम यांनी राजन विचारे यांना दिली. फलाट ६-७ वरून लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. तेथे शौचालयाची सोय नाही. प्रवाशांना त्यासाठी फलाट एक किंवा १0 वर जावे लागते. त्यासाठी येथे नवीन शौचालय बांधण्याबाबत पाहणी करून ते काम या वर्षात सुरू करण्याचे आश्‍वासन रेल्वे अधिकार्‍यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages