२२ जून रोजी चेंबूरमध्ये हाऊसिंग कॉन्फरन्स - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२२ जून रोजी चेंबूरमध्ये हाऊसिंग कॉन्फरन्स

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) चेंबूर सिटिझन फोरम आणि महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून चेंबूरमध्ये २२ जून रोजी सकाळी १0 ते १ या वेळेत हाऊसिंग कॉन्फरन्स पार पडणार आहे. या चर्चासत्रामध्ये डिम्ड कन्व्हेयन्स, पुनर्विकास प्रक्रिया तसेच गृहनिर्माण सोसायट्यांचे नवे नियम इत्यादी विषय पार पडणार आहे. हे चर्चासत्र विनामूल्य असणार आहे.
या चर्चासत्रामध्ये डिम्ड कन्व्हेयन्स या विषयावर जिल्हा उपनिबंधक एस. एम. पाटील, तसेच एम वॉर्डचे उपनिबंधक प्रसाद ओक या वेळेस उपस्थित राहणार आहे. तसेच पुनर्विकास प्रक्रियेवर सी.ए. राजकुमार अडुकिया, पुनर्विकास करारावर सी.ए. तरुण घिया, डिम्ड कन्व्हेयन्सनुसार स्टॅम्प ड्युटी अंमलबजावणी, डिम्ड कन्व्हेयन्स विषयावर सी.ए. रमेश प्रभू तसेच गृहनिर्माण सोसायट्यांचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. सी. डी. अष्टिकर मार्गदर्शन करणार आहेत. हे चर्चासत्र अहोबिल्ला माथ हॉल, एन. जी. आचार्य उद्यानाजवळ, ६ वा रोड, डायमंड गार्डन, चेंबूर, मुंबई ४000७१ येथे पार पडणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages