१0 लाख प्रवाशांचा टप्पा पार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१0 लाख प्रवाशांचा टप्पा पार

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comवर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाचे लोकार्पण ८ जून रोजी वादामध्ये पार पडले असले तरीही गेल्या साडेतीन दिवसांत दहा लाख सर्वसामान्यांनी मुंबई मेट्रोच्या प्रवासाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नवा इतिहास रचला आहे. 

वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाची कार्यप्रणाली सुरू झाल्यापासून बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजेपर्यंत दहा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४0 किमी ५९ तासांत दहा लाखांच्या प्रवाशांचा टप्पा हे अभिमानास्पद असून मुंबईकरांनी केलेले मेट्रोचे स्वागत आनंददायी असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर राज्यांतील मेट्रोची म्हणजेच दिल्ली मेट्रोशी तुलना करता मुंबई मेट्रो दर तासाला प्रत्येक किमीमागे १४८७ प्रवासी म्हणजेच दिल्ली मेट्रोपेक्षा दुप्पट प्रवासी वाहून नेते. १९0 किमी लांब पल्ल्यांच्या दिल्ली मेट्रोमध्ये २५ लाख प्रवासी नेहमी प्रवास करतात. सरासरी ७४0 प्रवासी दर तासाला प्रवास करतात. मेट्रोचे लोकार्पण ८ जून रोजी १ वाजता झाल्यावर ११ तासांत म्हणजेच दुपारी १ ते रात्री १२ वाजेपर्यंत २ लाख ४0 हजार प्रवाशांची नोंद करण्यात आली, तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच ९ जून रोजी सकाळी ५.३0 ते रात्री १२ वाजेपर्यंत २ लाख९२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. १0 जून रोजी त्याच वेळेत २ लाख ९७ हजार प्रवाशांनी प्रवास केला व बुधवारी म्हणजेच ११ जून रोजी सकाळी ५.३0 वाजता सुरू झालेल्या मेट्रोने सायंकाळी ४.३0 वाजेपर्यंत १ लाख ७१ हजारांचा असा एकूण दहा लाख प्रवाशांचा टप्पा पार केला असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages