मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मरोशी ते रुपारेल बोगदा प्रकल्पांतर्गत जलवितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी व त्याबरोबर इतर दुरुस्तीची कामे करण्यासाठी सहार अँकर ब्लॉक ते वांद्रे अँकर ब्लॉक दरम्यान ९६ इंच व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर बुधवार, १८ जून रोजी सकाळी १0 वाजल्यापासून ते गुरुवार, १९ जून रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे १८ ते १९ जूनपर्यंत शहर विभागातील ए, सी, डी, जी-उत्तर व दक्षिण तसेच बी व ई विभागातील काही परिसर तसेच पश्चिम उपनगरात एच-पूर्व आणि के-पूर्व विभागास होणार्या पाणीपुरवठय़ात २0 टक्के कपात होणार आहे.
Post Top Ad
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

