पालिका शाळेतील वॉटर फिल्टरबाबत अहवाल द्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2014

पालिका शाळेतील वॉटर फिल्टरबाबत अहवाल द्या

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी पालिकेने वॉटर फिल्टर बसवण्यासाठी गेल्या वर्षी तरतूद केली होती; पण शिक्षण विभागाने महापालिकेच्या किती शाळांत, किती वॉटर फिल्टर बसवले आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, किती शाळांत अजून वॉटर फिल्टर का बसवले नाहीत, फिल्टरच्या दुरुस्तीचे काम कसे केले जाते, याचा वस्तुनिष्ठ अहवाल शिक्षण समितीच्या पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला शुक्रवारी दिले. 
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी पालिकेने सर्व शाळांत वॉटर फिल्टर बसवले आहेत, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण अधिकार्‍यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या डॉ. अजंता यादव आणि शिवा शेट्टी यांनी निधीची तरतूद असतानाही प्रशासनाने शाळांत वॉटर फिल्टर बसवलेले नाहीत, तर गोराई येथील शाळेत अद्यापि वॉटर फिल्टर बसवलेला नाही, अशी तक्रार केली. त्यावर शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी एनजीओ व स्टेट बँकेने वॉटर फिल्टर बसवल्यामुळे त्या ठिकाणी पालिकेने वॉटर फिल्टर बसवले नाहीत, असे स्पष्टीकरण उपायुक्त सुनील धामणे यांनी दिले. बँकेने जेथे फिल्टर बसवलेले नाहीत तेथे पालिका फिल्टर बसवण्याचे आश्‍वासन धामणे यांनी या वेळी दिले
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS