दिवा-ठाणे पाचव्या-सहाव्या रेल्वे लाइनसाठी २0१५ उजाडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2014

दिवा-ठाणे पाचव्या-सहाव्या रेल्वे लाइनसाठी २0१५ उजाडणार

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)  मुंबई शहराच्या अत्यंत जवळ असणार्‍या दिवा-वसई-पनवेल मार्गाची स्थिती आजही सुधारलेली नाही. आजही या स्थानकांवर प्रवाशांसाठी देण्यात येणार्‍या पायाभूत सुविधांची वानवा आहे. विरार, नालासोपारा, वसईसोबतच डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबईला जोडणार्‍या या मार्गाची दशा अतिशय वाईट आहे.
रेल्वे प्रशासनाने दिवा-वसई-पनवेल या मार्गाला उपनगरीय रेल्वेचा दर्जा दिलेला आहे. तरीसुद्धा या मार्गावर कोणत्याही पद्धतीच्या सोयी-सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. २0११च्या डिसेंबर महिन्यात टी.सी. बेंजामिन (माजी प्रधान सचिव, अर्बन डेव्हलपमेंट) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची एक बैठक झाली होती. त्यामध्ये एमयूटीपी फेझ-३ अंतर्गत ८ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये विरार-वसई-पनवेल मार्गाचाही समावेश होता. सुमारे ७0 किमी लांबीच्या या लोकल कॉरिडॉर प्रकल्पावर रेल्वे प्रशासनातर्फे मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ६000 करोड रुपयांच्या या प्रकल्पात २५ स्थानकांची निर्मिती करण्यात येणार होती. त्यामुळे वसई, नालासोपारा आणि विरारला नवी मुंबईशी जोडण्यासोबतच डोंबिवली-कल्याणच्या प्रवाशांना पनवेलला जाण्यास मदत होणार होती. 

मुंबई रेल्वे विकास महामंडळ प्रशासनाने या मार्गावरील प्री फिजिबिलिटी स्टडी करून त्याची फाईल दिल्लीला रेल्वे बोर्डाला पाठवली; परंतु आजपर्यंत त्या फाईलवर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही. मुंबई रेल्वे विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांना या प्रकल्पाविषयी विचारले असता, प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर देण्यात येते.?मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर राबवण्यात येणार्‍या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे दिवा ते ठाणे या स्थानकांदरम्यान पाचवी-सहावी रेल्वे लाइन टाकणे. सध्या हे काम सुरू आहे. मात्र दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे लाईनचे काम पूर्ण होण्यासाठी २0१५ची वाट पाहावी लागणार आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS