मरेने ३१ कोटी, तर परेने ४0 कोटी कमावले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मरेने ३१ कोटी, तर परेने ४0 कोटी कमावले

Share This
मुंबई : रेल्वेच्या तिकिटाचे दर वाढवण्यात आल्यामुळे देशातील जनतेने आणि राजकीय पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध निषेध नोंदवल्यानंतर मोदी सरकारने सरसकट भाडेवाढ मंगळवारी रात्री मागे घेतली. त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या सेकण्ड क्लासच्या पासावर आणि फस्ट क्लासच्या तिकीट व पासावर फक्त १४.२ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा नवा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकांवर पास काढण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. रेल्वे प्रशासनाने भाडेवाढ मागे घेतली असल्याच्या उद्घोषणा मंगळवारी रात्री रेल्वे स्थानकांमध्ये करण्यात आल्या होत्या, तरीसुद्धा प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम होते. या सर्व परिस्थितीत मध्य रेल्वेने २४ जून रोजी एका दिवसात पासाच्या विक्रीमधून तब्बल १८ कोटी, रुपये तर ५ दिवसांच्या पासाच्या विक्रीमधून ३१ कोटी रुपये तर पश्‍चिम रेल्वेने ४0 कोटी कमावले.
रेल्वेची सरसकट भाडेवाढ करताना कोणत्याही सोयीसुविधा न देता प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लावणार्‍या केंद्र सरकारविरुद्ध प्रवाशांनी आपला निशेष व्यक्त केला, तर दुसरीकडे भाडेवाढीपूर्वी पास काढण्यावर प्रवाशांनी भर दिला. शनिवार, रविवार, समोवार आणि मंगळवारी प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. मध्य रेल्वेवर दररोज ३ कोटी रुपयांचा महसूल जमा होतो; पंरतु भाडेवाढीच्या धसक्याने मध्य रेल्वे मार्गावरील १ लाख ५७ हजार ६४५ प्रवाशांनी २४ जून रोजी पास काढला. यामुळे एका दिवसात मध्य रेल्वेला १८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला, तर गेल्या ४ दिवसांपासून मध्य रेल्वेने ३१ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. रेल्वेची भाडेवाढ येत्या २८ जूनपासून लागू होणारआहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages