'कॅम्पा कोला'मधील वीज, गॅसच्या सर्व जोडण्या तोडल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2014

'कॅम्पा कोला'मधील वीज, गॅसच्या सर्व जोडण्या तोडल्या

वरळी : येथील कॅम्पा कोला कंपाऊंडमधील सर्व बेकायदा इमारतींच्या वीज आणि गॅसच्या जोडण्या तोडण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले, तर या इमारतींमधील पाण्याच्याही बेकायदा जोडण्या तोडण्याची कारवाई आणखी दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. 
कॅम्पामधील ९0 फ्लॅटमध्ये विजेच्या आणि गॅसच्या जोडण्या तोडण्याचे काम बेस्ट आणि महानगर गॅसने गेल्या दोन दिवसांपासून सुरू केले होते. ते बुधवारी संपले. मात्र या सर्व ९0 बेकायदेशीर फ्लॅटमध्ये पाण्याच्या अनधिकृत जोडण्या असून त्यापैकी ५0 जोडण्या तोडल्या आहेत आणि ४0 जोडण्या खंडित करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी दिली. या कारवाईसाठी महापालिकेने १४ पथके तैनात केली असून बेस्टची व महानगर गॅस लिमिटेडची (एमजीएल) प्रत्येकी चार पथके तैनात केली आहेत. वीज, गॅस आणि पाण्याच्या जोडण्या तोडण्याचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर घरांच्या भिंती तोडण्याची कारवाई क रण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS