परेची फुकट्यांकडून मेमध्ये 11 कोटींची दंडवसुली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परेची फुकट्यांकडून मेमध्ये 11 कोटींची दंडवसुली

Share This
मुंबई - पश्‍चिम रेल्वेने मे महिन्यात फुकट्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई केली होती. या कारवाईत दोन लाख 33 प्रकरणे समोर आली. त्यात 11 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. आरक्षित तिकिटांच्या हस्तांतरणाची 1862 प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणात 20 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 1255 भिकारी व अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करून त्यांना रेल्वे स्थानक परिसराबाहेर हटवण्यात आले. काही जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला, काही जणांना दंड ठोठावण्यात आला; तर 90 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. विनातिकीट प्रवाशांविरोधातील कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन पश्‍चिम रेल्वेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages