आठवले यांची 25 जागांची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवले यांची 25 जागांची मागणी

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comविधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून 25 जागा मिळाव्यात व त्या जागांवर मित्रपक्षांचे बंडखोर उभे राहू नयेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली.


महायुतीमधील मित्रपक्षांना रिपब्लिकन पक्षाने पूर्ण ताकदीने मदत केली आहे. त्याचप्रमाणे मित्रपक्षांनी रिपाइंच्या उमेदवारांना जिंकून येण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज चेंबूर येथील गुरुकृपा सभागृहात झाली. त्या वेळी आठवले बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला साताऱ्याची जागा सोडण्यात आली होती; पण मित्रपक्षांची मते त्या उमेदवाराला मिळाली नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची खात्री असलेल्या 25 जागा मिळाव्यात व मित्रपक्षांनी मदत करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, राजा सरवदे या वेळी उपस्थित होते. 

पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी जास्तीत जास्त जागांवर विजयी होण्याची गरज आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत निश्‍चितपणे सत्तांतर घडेल, असा विश्‍वास आठवलेंनी व्यक्त केला. सत्ता आल्यानंतर पक्षाला मंत्रिमंडळ व महामंडळ या माध्यमातून सत्तेमध्ये 15 टक्के वाटा मिळणे आवश्‍यक आहे, याबाबतचा ठराव आजच्या बैठकीत संमत करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, शेतकरी व शेतमजूर या सर्वांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देईल, असा विश्‍वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

बैठकीतील मुद्दे - विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची शक्‍यता असलेल्या जागा हव्यात
- पराभवाची शक्‍यता असलेल्या जागा स्वीकारणार नाही
- साताऱ्यात शिवसेना, भाजपने अपेक्षित मदत केली नाही
- कॉंग्रेसने केंद्रीय मंत्रिपदाचे आश्‍वासन देऊन अखेरपर्यंत पद दिले नाही
- एनडीए सरकार मंत्रिपद देईल अशी खात्री
- विधानसभेचे जागावाटप महिन्याभरात व्हावे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages