मेट्रोचा प्रवास ५ रुपयांत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोचा प्रवास ५ रुपयांत

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमुंबईकरांचा अलोट प्रतिसाद मिळत असतानाच 'मेट्रो'ने प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली असून कमी गर्दीच्या वेळी म्हणजेच सकाळी आठच्या आधी 'मेट्रो'च्या प्रवासासाठी अवघे पाच रुपयेच मोजावे लागणार आहेत. उद्या, गुरुवारपासून आठवडाभर प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.
अधिकाधिक प्रवाशांना 'मेट्रो'कडे आकर्षित करण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन' कंपनीने ही स्वस्त प्रवासाची योजना आणली आहे. विशेषत: कमी गर्दीच्यावेळीही प्रवाशांची संख्या वाढावी, असा आमचा उद्देश असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

सकाळी ५.३० ते ८ या वेळेत हा स्वस्त प्रवास करता येणार आहे. पाच रुपयांत कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान तुम्ही प्रवास करू शकाल. स्मार्ट कार्डधारकांसाठीही ही सेवा उपलब्ध करण्यात आली असून टोकन घेतल्यापासून पुढच्या अर्ध्या तासात प्रवास सुरू न केल्यास हे टोकन रद्द मानले जाणार आहे. ५.३० ते ८ या वेळेत 'मेट्रो'च्या सर्व स्थानकांवर ही टोकन मिळतील, असेही सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages