समुद्र किनाऱयांवर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत शिरले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समुद्र किनाऱयांवर टाकलेल्या भरावामुळे मुंबईतील अनेक भागांत शिरले

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
मुंबईतील अनेक भागांत गुरुवार, दिनांक १२ जून २०१४ रोजी व शुक्रवार, दिनांक १३ जून, २०१४ रोजी समुद्राच्या भरतीचे पाणी शिरले, या सर्व घटनेला ‘सीआरझेड’चे नियम डावलून मुंबईतील समुद्र किनाऱयांवर भरणी टाकून त्यावर ‘वॉक-वे’ तयार करणारे व अनेक ठिकाणी भरणी टाकून त्यावर ट्रायपॉड टाकणारे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील मेरीटाईम बोर्ड जबाबदार आहे, असे परखड प्रतिपादन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी आज (दिनांक १३.०६.२०१४) केले.

समुद्राच्या भरतीचे पाणी माहीम, वरळी, दादर आदी भागातील वस्त्यांमध्ये शिरण्याच्या घटनेबाबत एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याचे व दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

याबाबत विस्ताराने बोलताना महापौरांनी नमूद केले की, महापालिकेला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता व ‘सीआरझेड’ चे नियम डावलून माहीम, दादर व वरळी भागातील स्थानिक आमदारांच्या हट्टाला बळी पडत महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाईम बोर्डाद्वारे मुंबईच्या समुद्र किनाऱयांवर भरणी टाकून त्यावर ‘वॉक-वे’ तयार केले आहेत; तर अनेक ठिकाणी भरणी टाकून त्यावर ट्रायपॉड टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचा नि निसर्गाचा समतोल बिघडून समुद्राचे पाणी रस्त्यावर व वस्त्यांमध्ये शिरत आहे? याची उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे.

मुंबईकरांची सुरक्षा आणि मुंबईचे पर्यावरण हे अत्यंत संवेदनशील विषय असून याबाबत तातडीने चौकशी समिती नेमून समितीच्या अहवालांनुसार दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारची पर्यावरणाला बाधा उत्पन्न करणारी व नागरीकांची सुरक्षितता वेशीवर टांगणारी कामे होणार नाहीत,असे शासनाने पहावे, असेही .महापौरांनी कळविले आहे.

याबाबत महापौरांनी बोलताना नमूद केले की, गुरुवार व शुक्रवारच्या समुद्राला आलेल्या भरतीच्या वेळी ज्या-ज्या भागात पाणी शिरले होते, त्या-त्या भागांमध्ये महापालिकेचे कर्मचारी कामे करताना दिसत होते. मात्र, ज्यांनी समुद्रात भरणी टाकली, वॉक-वे बांधले त्या मेरीटाईम बोर्ड किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारी याठिकाणी फिरकलेसुद्धा नाहीत, यावरुनच राज्य शासनाला मुंबईकरांची किती काळजी आहे? ते दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विशेष लक्ष घालावे व दोषींवर तातडीने कारवाई करावी, असे आवाहन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी मुख्यमंत्री महोदयांना केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages