मुंबई - परळमधील केईएम रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर गैरहजर असल्याने नातेवाईकांनाच रुग्णांना स्ट्रेचर आणि व्हिलचेअरवरून तपासणी व इतर कामांसाठी न्यावे लागत आहे. यातील काही कर्मचारी हजेरी लावून घरी जात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर, परळमधील के.ई.एम. आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. यातील अत्यवस्थ रुग्णांना स्ट्रेचर किंवा व्हिलचेअरवरून हलवावे लागते. हे काम चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे असते. मात्र, हे कर्मचारी तुरळक असल्याने रुग्णाला एका विभागातून दुसऱ्या विभागात चाचण्यांसाठी नेण्याचे काम त्यांच्या नातेवाईकांना करावे लागत आहे. सर्वच पालिका रुग्णालयांत सर्रास हा प्रकार घडतो. कर्मचारी कमी असल्याचे कारण रुग्णालयाकडून दिले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र रोजच्या गैरहजेरीमुळे हे घडत असल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये मंगळवारी (ता. 24) एकाचवेळी सुमारे 40 टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले. एकाच वेळी 100 हून अधिक कर्मचारी गैरहजर असल्याने त्याचा त्रास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आढळले.
संघटनेमुळे कारवाई करणे अवघड
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संघटना मजबूत असल्याने पालिकेलाही त्यांच्यावर कारवाई करताना विचार करावा लागतो. गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास संघटनेकडून प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी टप्या-टप्यात कारवाई करण्याचा विचार पालिका करत आहे.
कारणे दाखवा नोटीस एकाच वेळी 40 टक्के कर्मचारी गैरहजर राहणे अपेक्षित नाही. त्यामुळे त्याचा ताण 60 टक्के कर्मचाऱ्यांवर तर येतोच याशिवाय त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर आणि रुग्णांवरही होतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे.