हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ भूखंड वाचवा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ भूखंड वाचवा

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
एलफिस्टन येथील सेनापती बापट मार्गावरील आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना तसेच स्वतंत्र सैनिक हुतात्मा बाबू गेनू मेमोरियल कामगार क्रीडा केंद्राच्या जागेवर अवैध बांधकाम झाले असल्याने याबाबत चोकशी करून हा भूखंड पालिकेने वाचवावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप गायकवाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. 
आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन एसआरए योजने अंतर्गत विकासकाने एलफिस्टन येथील स्वतंत्र सैनिक बाबू गेनू यांची स्मरणार्थ असलेल्या कामगार क्रीडा केंद्राची जागा बळकावली आहे. सार्वजनिक रस्त्याच्या नवा खाली रस्ता मंजूर करून खाजगी कामासाठी वापरण्यात येत आहे तसेच अनधिकृत पाने कायदे धाब्यावर बसवून उभारलेल्या इमारती मधील गाळे बेकायदेशीर पाने विकण्यात आले आहेत. 

झोपडीधारकांची फसवणूक करून २०० सदनिका अवैधरीत्या बांधून त्यांची विक्री करण्यात आली आहे. या सदनिका पालिकेने ताब्यात घेवून गरीब गरजू किवा गिरणी कामगारांना देण्यात याव्यात. या ठिकाणी जे अवैध बांधकाम झाले आहे त्याची चौकशी करावी, दोषी अधिकारी विकासक यांच्यावर कारवाही करावी तसेच स्वतंत्र सैनिक बाबू गेनू यांच्या स्मरणार्थ असलेला भूखंड वाचवावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages