१०० वर्षातील सर्वात कमी पाऊस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१०० वर्षातील सर्वात कमी पाऊस

Share This
गेल्या दहा दिवसात मान्सून इंचभरही पुढे सरकरलेला नसून गेल्या १०० वर्षात जून महिन्यातील हा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. मान्सूनचा लहरीपणा असाच कायम राहिल्यास नव्याने केंद्रातील सत्तेत आलेल्या मोदी सरकारपुढे दुष्काळाच्या रुपाने पहिले संकट उभे ठाकण्याची भीती आहे.
जून महिन्यातील पाऊस शेतीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात आतापर्यंत अवघा ३७ टक्केच पाऊस झाल्याने सगळीच गणितं बिघडली आहेत. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्यात तर काही भागांत पेरलेलं बियाणं रखरखत्या उन्हामुळे मातीत मिळालं आहे. परिणामी फळ-भाजांचे दरही कडाडू लागले आहेत.

याबाबत काही जाणकारांची मते जाणून घेतली असता, मान्सून सक्रिय न झाल्यास महागाई आणखी भडकण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे हवामान विभागाकडूनही निराशा वाढवणारीच बातमी आहे. हवामान विभागाचे प्रमुख बी. पी. यादव यांनी पुढचे दोन ते तीन दिवस मान्सून पुढे सरकण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे नमूद केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages