पावसाळय़ासाठी बेस्ट सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळय़ासाठी बेस्ट सज्ज

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमुंबईमध्ये पावसाळय़ात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे तसेच विजेचा झटका बसून अपघात होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या समस्यांचा सामना करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रतिबंधनात्मक उपाययोजना राबवण्यासोबतच नागरिकांना मार्गदर्शनपर सूचनाही केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रात्रंदिवस तसेच सुट्टीच्या दिवशी व रविवारी कार्यरत असणारे कॉल सेंटर कार्यरत केले आहेत, ज्यांचा दूरध्वनी क्रमांक २२८४३९३९ आहे.
उपक्रमाकडे ९.७ लाख वीज ग्राहकांची संगणीकृत माहिती उपलब्ध असलेले तसेच कुलाब्यापासून सायन, माहिमपर्यंतच्या वीज ग्राहकांची पूर्ण माहिती असलेले हे कॉल सेंटर आहे. कॉल सेंटरवर तक्रार करताना वीज ग्राहकांना फक्त त्यांचा वीज ग्राहक क्रमांक अथवा वीजमापन क्रमांक नोंदवावा लागणार आहे. पावसाळय़ात ज्या सदनिकांना-घरांना अथवा इमारतींना तात्पुरता पुरवठा देण्यात आला आहे, त्यांनी फक्त आवश्यक उपकरणांचा वापर करावा. विद्युत ठिणगी पडत असेल तसेच पाणी ठिबकत असेल, मार्ग, प्रकाश स्तंभांना, रस्त्यावर असणार्‍या लाल रंगाच्या डिस्ट्रिब्युशन पिलर्स व केबिनमधील वीजमापकांना स्पर्श करू नका, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages